मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024: संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांचे आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिकेला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेतर्गत, महाराष्ट्रातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला रु. १,५००/- आर्थिक मदत थेट बँक खात्यात (DBT) जमा केली जाईल.
योजनेचे स्वरूप:
- पात्र महिलांना आधार लिंक असलेल्या बँक खात्यात थेट हस्तांतरण (DBT) पद्धतीने दर महिन्याला रु. १,५००/- जमा केले जाईल.
पात्रता:
- महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
- विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता किंवा कुटुंबातील एक अविवाहित महिला पात्र असेल.
- महिलेचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल ६५ वर्षे असावे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.
अपात्रता:
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखांपेक्षा जास्त असल्यास.
- कुटुंबातील सदस्य आयकरदाता असल्यास.
- कुटुंबातील सदस्य राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये कायमस्वरूपी कर्मचारी असल्यास किंवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत असल्यास.
- महिला अन्य शासकीय योजनांचा दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त लाभ घेत असल्यास.
- कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार असल्यास.
- कुटुंबातील सदस्य राज्य किंवा केंद्र सरकारच्या उपक्रमांचे संचालक/सदस्य असल्यास.
- कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) नोंदणीकृत असल्यास.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- बँक खाते तपशील (खाते आधार लिंक असणे आवश्यक)
- लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो
- अधिवास प्रमाणपत्र किंवा १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास आवश्यक नाही, शुभ्र शिधापत्रिका असल्यास आवश्यक)
- नवविवाहित महिलांसाठी विवाह प्रमाणपत्र
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:
- Majhi Ladki Bahin Yojana च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- होम पेजवर अर्जदार लॉगिन पर्यायावर क्लिक करा.
- नवीन USER ID आणि PASSWORD तयार करा.
- Create Account पर्यायावर क्लिक करून Sign Up फॉर्म भरा.
- General Woman पर्याय निवडा.
- Captcha भरा आणि Sign Up करा.
- मोबाईलवर आलेला OTP व्हेरिफाय करा.
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया:
- USER ID आणि PASSWORD वापरून लॉगिन करा.
- Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana वर क्लिक करा.
- आधार क्रमांक टाकून व्हेरिफाय करा.
- अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करा.
महत्त्वाची सूचना:
ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका, सेतु सुविधा केंद्र, आशा सेविका, आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
FAQ:
लाडकी बहीण योजनेची पात्रता? २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट? https://ladakibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडली बहना योजना 2024 अंतर्गत आर्थिक सहाय्य काय आहे? १५०० रुपये प्रति महिना आर्थिक मदत दिली जाते.
0 Comments